पाहा Video : 'चंद्रमुखी'च्या निमित्ताने अमृताने केला या गोष्टीचा खुलासा, म्हणते "रोमान्स करण्याची वाटते भिती..."
By Prerana Jangam
on
संध्या चंद्राची सगळीकडेच चर्चा आहे. 'चंद्रमुखी' चित्रपटातील चंद्रा हे गाणं चित्रपट प्रदर्शनाआधीच मोठ्या प्रमाणात चर्चेत आलय. सोशल मिडीयावर या गाण्याची जोरदार चर्चा आहे. यातच अमृता खानविलकरच्या नृत्याने आणि अदांनी लक्ष वेधलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने अमृतासोबत संवाद साधलाय. यावेळी या भूमिकेसाठीचा प्रवास अमृताने सांगितलाय. चित्रपटात अमृता आणि आदिनाथ कोठारेचा म्हणजेच चंद्रा आणि दौलतचा रोमान्स दाखवण्यात आलाय. याविषयी अमृता सांगते की तिला रोमान्स करण्याची प्रचंड भीती वाटते. मात्र रोमँटिक सीन आणि केमिस्ट्रीचं श्रेय अमृता दिग्दर्शक प्रसाद ओकला देते.
Read More