Search result for: Amruta Chiranjivi Chougule

Thursday, 28 Mar, 2019
बने फॅमिलीमधील लहान सदस्यांच्या भेटीला येणार हनी आणि बनी
परीक्षेमुळे लहान मुलांच्या खेळण्याची वेळ कमी होते, त्यांना थोडवेळ मस्ती करु का असे विचारावे लागते आणि सतत अभ्यास करा असं देखील ऐकावं लागतं. अशीच काहीशी गत झाली आहे ह.म.बने तु.म.बने मालिकेतील ज्युनिअर्स बनेंची. आता सध्या सगळीकडे परीक्षेचे वारे वाहत आहेत आणि या कुटुंबातील लहान मुलं देखील परीक्षेच्या अभ्यासात गुंग झाली आहेत. जरी ते गुंग झाले असले तरी त्यांचं संपूर्ण लक्ष हे सोनी ये’च्या हनी आणि बनी या धमाल जोडीकडे आहे. ‘सोनी ये’ या लहान मुलांच्या वाहिनीवरील हनी आणि बनी हे दोन कार्टून फारच लोकप्रिय होत आहेत. ‘सब झोलमाल है’ या ऍनिमेटेड कॉमेडी टेलिव्हिजन कार्यक्रमातील अनेक पात्रांपैकी दोन पात्रं म्हणजे जुळ्या मांजरी हनी आणि बनी. या दोघांची एकत्र टीम बनवून इतरांसोबत प्रँक करण्याचा किंवा इतरांची मजा घेण्यातयांना आनंद मिळतो. या हनी आणि बनीसोबत धमालमस्ती करण्याचे वेड बने कुटुंबामधील लहान सदस्यांनी ही लागले आहेत. पण परीक्षा असल्यामुळे पहिले अभ्यास आणि मग खेळ असं सांगून परीक्षा संपल्यावरत्यांच्या भेटीला येणार आहेत हनी आणि बनी. त्यांची पहिली भेट कशी असेल, ते कायकाय धमाल करतील हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा ह.म.बने तु.म.बने’ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त सोनीमराठीवर.   Read more...

Wednesday, 27 Mar, 2019
मृण्मयी देशपांडेच्या नव्या लूक बाबत चाह्त्यांना उत्सुकता
नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. सध्या मृण्मयीचा हटके लूक असणारा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. यात मृण्मयी शॉर्ट Read more...

Wednesday, 27 Mar, 2019
एक होती राजकन्यामधील पुष्कराज आणि अवनीच्या भेटीची रसिकांना उत्सुकता
सोनी मराठीवरील 'एक होती राजकन्या' मधील 'अवनी'ने आता प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर केले आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या राजकन्येचा हा प्रवास दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. त्यामध्येच एका 'खास' नवीन पात्राने मालिकेत एंट्री केली आहे. पत्रकार असलेल्या या नव्या पात्राचे नाव आहे 'पुष्कराज'. अभिनेते आस्ताद काळे ही भूमिका निभावताना दिसतील. पुष्कराजची 'हटके' एंट्री आणि अवनीशी झालेल्याभेटीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच ताणली गेली आहे. 'एक होती राजकन्या' मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कर्तव्यनिष्ठ, साधी, हळवी अशी बाबांची लाडकी राजकन्या अवनी सगळ्यांनाच भावली आहे. आतापर्यंत झालेल्याएपिसोड्स मधून अवनीचा स्वभाव, तिच्या घरचे वातावरण, तिचे पोलीस खात्यात वावरणे इ. प्रेक्षकांच्या चांगलेच ओळखीचे झाले आहे. अवनीच्या या छोट्याश्या जगात आता एका नवीन पात्राची भर पडली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आस्ताद काळे साकारत असलेल्या पुष्कराजची एंट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी सुखद धक्काच आहे. पुष्कराज पोलीस ठाण्यात बातमी शूट करत असताना अवनी अनवधानाने त्याच्या वाटेतयेते. अवनी आणि पुष्कराजची ही प्रोमोत दिसलेली ओझरती भेट बरंच काही सांगून जाते. पुष्कराज पोलीसांशी बोलत असताना अवनीच्या वडिलांचा संदर्भ आलेला प्रोमोत दिसतो. त्यामुळे तो आणि अवनी त्यांची भेटव्हायच्या आधीच एका अदृश्य धाग्याने बांधले गेले आहेत असे प्रेक्षकांना वाटत आहे. वरवर पाहता साधी वाटणारी हि अचानक झालेली छोटीशी भेट कोणते वळण घेईल..., का ती एका नव्याच कथानकास सुरुवातकरेल.., हे पाहणे मनोरंजक असणार आहे. पुष्कराज आणि अवनीची भेट अचानक झाली असली तरी अवनीला पुष्कराजबद्दल आधीपासूनच आदरयुक्त कुतुहूल आहे. पण पुष्कराज नक्की कोण आहे, त्याचा भूतकाळ काय आहे आणि त्याच्या अचानकयेण्याचा हेतू काय असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. मालिकेचे पदर जसे उलगडत जातील तसा पुष्कराज प्रेक्षकांना कळू लागेल. अवनी आणि पुष्कराज मध्ये कशा प्रकारचा संवाद होतो, त्यांच्यात कसे नातेनिर्माण होते यावर प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. कदाचित पुष्कराजचा मालिकेतील प्रवेश मालिकेला एकदम कलाटणी देखील देऊ शकेल. मालिकेतील हि सर्व नवी वळणं पाहणे मनोरंजक असणार आहे. राजकन्या अवनीच्या भावविश्वात सामील होण्यासाठी पहा, 'एक होती राजकन्या', फक्त सोनी मराठीवर.   Read more...

Wednesday, 27 Mar, 2019
जागतिक रंगभूमी दिन विशेष : यासाठी साजरा करतात रंगभूमी दिन
नाटक हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही तर अभिव्यक्तीचंही माध्यम आहे. नाटक जिथं सादर केलं जातं त्या रंगभूमीला खुप मोठा इतिहास आहे . रंगभूमीचं व्यक्तीच्या सांस्कृतिक आयुष्यातील योगदान जाणून घेऊन १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने रंगभूमी Read more...

Wednesday, 27 Mar, 2019
‘प्रीतम’मध्ये दिसणार कोकणच्या सौंदर्याचा मनमोहक नजारा
निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण . गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांमधून कोकणाची निसर्गरम्य भूमी रुपेरी पडद्यावर दिसली. विस्तीर्ण निळेशार समुद्रकिनारे, कौलारू घरं, नारळ सुपारी, आंब्याची झाडं, सुंदर-शांत असा आसमंत आणि संस्कृती Read more...

Tuesday, 26 Mar, 2019
रोहीत राऊत आता सुरु करणार दुसरी इनिंग, या भुमिकेत येणार रसिकांसमोर
रोहीत राऊत खुप लहान वयापासून संगीत क्षेत्राशी जोडला गेलेला आहे. रोहीतने आतापर्यंत दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’ या सिनेमांसाठी पार्श्वगायन केलं आहे. ‘सारेगाममापा’ या रिअ‍ॅलिटी शो मधून Read more...

Tuesday, 26 Mar, 2019
पाण्याच्या एक एक थेंबाचं महत्त्व सांगणारा सिनेमा 'H2O'
कहाणी थेंबाची या नावाची टॅगलाईन घेऊन 'H2O'  हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर  आता सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. Read more...

Tuesday, 26 Mar, 2019
मामाच्या लग्नाला यायला तयार आहात का?, ‘वेडिंगचा शिनेमा’च्या धमाकेदार ट्रेलर पहा
गायक, संगीतकार, लेखक आणि परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर सलील कुलकर्णी आता दिग्दर्शकाच्या रुपात समोर येत आहेत. त्यांच्या पहिल्या वहिल्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे लग्नघरातील गडबड धांदल दिसत Read more...

© Copyright Clapping Hands Private Limited.
About Us | SITEMAP