बिग बॉस मराठी 3 : टास्कदरम्यान स्नेहा वाघ आणि मीनल शाहमध्ये वाद, स्नेहा म्हणते "मी माझ्या मतांवर ठाम"

By  
on  

बिग बॉस मराठी सिझन 3 चा दुसरा आठवडा कसा असेल याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष असणारेय. तेव्हा स्पर्धक या आठवड्यात टास्क कसे खेळतात आणि कसं मनोरंजन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यातच स्पर्धकांना या आठवड्यात विविध टास्क देण्यात आले आहेत.

एका टास्क दरम्यान आता मीनल शाह आणि स्नेहा वाघमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. ज्यात मीनल स्नेहाच्या परफॉर्मन्सविषयी म्हणते. तेव्हा स्नेहा म्हणते की "इथे डान्स करायचा होता का ?" याशिवाय मीनले स्नेहावर आरोप केलाय की जिथे मेजॉरिटी असते तिथे स्नेहाचं मत असतं. यावर स्नेहाने मीनलला उत्तर दिलय.

स्नेहा म्हणते की "मी जितकी माझ्या मतांवर ठाम आहे इथे तितकं कुणीच नाही". या टास्कदरम्यान मीनल आणि स्नेहामध्ये वाद होताना दिसणार आहे. ज्यात दोघही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसणार आहेत. हा नेमका कोणता टास्क असेल ? स्नेहा आणि मीनलचा हा वाद कुठून सुरु झाला यासाठी 'बिग बॉस मराठी सिझन 3' चा नवा भाग पाहणं रंजक ठरेल.

Read More
Tags
Loading...

Recommended