बिग बॉस मराठी 3 : घरात ज्येष्ठ अभिनेत्रीची होणार का एन्ट्री?

By  
on  

 बिग बॉस मराठी सिझन ३ हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक ते गाजवतायत आणि तुफान राडा घालतायत. अनेक मातब्बर सेलिब्रिटी या घरात आमने-सामने आले आहेत. प्रत्येकालाच घरात टिकून राहायचंय आणि शो जिंकायचाय. त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीने खेळतोय. मागच्या आठवड्यात आदिश वैद्यची घरात वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री जालीय तर अभिनेता अक्षय वाघमारेचं घरातलं पहिलं एनलिमनेशन झाल तर या आठवड्यात अभिनेत्री सुरेखा कुडची यांना कमी वोट्स मिळाल्याने त्यांना हे घर सोडावं लागलं. 

अशातच नव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात आजीबाईंची एन्ट्री झाली आणि त्यांच्या आगमनाने स्पर्धकांमध्ये एकच उत्साह संचारला. या आजीबाई नक्की आहेत तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांसोबत स्पर्धकांनाही पडला आहे. 'कारट्यांनो किती धुडगूस घालताय रे... हा संपूर्ण आठवडा माझी तुमच्यावर नजर असणार आहे. चला लागा तयारीला' असं म्हणत आजीनं घरात एन्ट्री घेतली आहे. पण हा आवाज ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांचा असल्याने त्या घरात अवतरणार का असा एक मोठा प्रश्न प्रेक्षकांना प़डला आहे. त्यामुळे सर्वचजण प्रत्येक भाग आतुरतेने पाहतोय.

ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी  अनेक धम्माल विनोदी भूमिका आणि खाष्ट व्यक्तिरेखांमधून मालिका सिनेमे गाजवले आहेत.  

 

त्यामुळे येत्या दिवसांत आणखी काय काय ट्विस्ट येणार हे पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे. 

 

Read More
Tags
Loading...

Recommended