बिग बॉस मराठी 3 Day 22 : घरामध्ये रंगणार “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य !

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल एका नव्या आणि आपल्या सगळ्यात आवडत्या - जवळच्या सदस्याची एंट्री झाली आणि ती व्यक्ति म्हणजे “आजी”. आजीने काल गोष्टींमधील जादू खरी केली आणि घरामध्ये ठेवला जादूचा दिवा. ज्या दिव्याद्वारे सदस्यांना एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी दिली. घरामध्ये पार पडले “इच्छा माझी पुरी करा” हे नॉमिनेशन कार्य. आणि या कार्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले संतोष चौधरी (दादूस), विकास पाटील, आदिश वैद्य आणि मीनल शाह. आता बघूया या सदस्यांमध्ये कोण घराबाहेर जाणार आणि कोण सेफ होणार.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्य घरामध्ये लपवलेले भोपळे शोधण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. जो एक सदस्य सर्व फेर्‍यांमध्ये भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरेल तो सदस्य कॅप्टन पदाचा पहिला उमेदवार ठरणार आहे. बघूया कोण असेल तो सदस्य. 


 \
जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Read More
Tags
Loading...

Recommended