बिग बॉस मराठी 3 Day 22 : विकासच्या मते घरातला हा सदस्य खेळतोय डबल गेम

By  
on  

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “इच्छा माझी पुरी करा” या नॉमिनेशन कार्यामध्ये सदस्यांना घरातील एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी बिग बॉस यांनी दिली. यानुसार सदस्यांनी त्यांना जे योग्य वाटतील आशा सदस्यांना वाचवले. ज्यामध्ये आदिश वैद्यने आविष्कार दारव्हेकरला वाचवले. ज्याबद्दल आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे. विकास, सोनाली, मीनल आणि विकास याबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत.

विकास बोलताना म्हणणार आहे, मी त्याला विचारलं तू आविष्कारला का सेफ केलंस ? त्याने मला काहीतरी कारण दिले. मी आता असा विचार करतो आहे त्याने आविष्कारला सेफ करण्यामागे काय कारण असेल ? सोनाली म्हणाली, “मी आताच विचारलं त्याला, जे त्याने मला फिरवून सांगितलं, की मी बाकीच्या लोकांच्या डोक्यामध्ये जाण्याची स्ट्रॅटजी होती, जेणेकरून त्यांना असं वाटावं की गृप मधील सदस्य आणि माझं नीट कम्युनिकेशन झालेलं नाहीये किंवा एकीकडे विश्वास संपादन करणार कोणी नाहीये जेणेकरून मी त्या लोकांच्या डोक्यामध्ये जाईन”.

विकास त्यावर म्हणाला, “तो डबल गेम खेळतो आहे.” विशाल, सोनाली आणि मीनल यांनी देखील सहमत डाखाली. विशाल म्हणाला, “जसं टिचिंग टास्कमध्ये झालं”. आता नक्की काय घडलं, त्यांना ही चर्चा करावी असं का वाटलं ? बघा आजच्या भागामध्ये.

बघूया आज घडतं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Read More
Tags
Loading...

Recommended