बिग बॉस मराठी 3: विकासने मीनलसमोर मांडली त्याची व्यथा

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या “इच्छा माझी पुरी करा” या नॉमिनेशन कार्यामुळे बर्‍याच सदस्यांची मनं दुखावली गेली आहेत असे दिसून येते आहे. विकास, मीनल, विशाल, सोनाली, आदिश या गटामध्ये मीनल, विकास आणि आदिश घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत.

आदिशला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने आविष्कार दारव्हेकरला वाचवले आणि जेव्हा मीनलला संधी मिळाली तेव्हा तिने सोनाली पाटील आणि विशाल निकमला वाचवले. आणि याचेच कुठेतरी विकास पाटीलला वाईट वाटले. आणि हीच खंत तो मीनललासोमर व्यक्त करताना आज दिसणार आहे.

 

या घरामध्ये नक्की कोणावर विश्वास ठेवावा ? नक्की कोण आपले आहे ? हे कळायला जरा वेळ लागतो हे मात्र नक्की ! त्याच उलट जयने उत्कर्ष आणि गायत्रीला सेफ केले तर उत्कर्षने मीरा आणि जयला सेफ केले तर दादूसने स्नेहा वाघला. आज मीनल विकासशी बोलताना दिसणार आहे, “मला स्नेहा येऊन म्हणाली की विकास अप्सेट आहे म्हणून. की मी तुम्हांला कमिट केले होते. ही लोकं मला बोलत आहेत हे केले मी ते केलं मी.

हे बघा त्यांच्या पॉइंट ऑफ व्यूने गेम नाही चालणार विकास. मी हेचं म्हणते आहे पहिल्यापासून”.विकास त्यावर म्हणाला, “मी असं कोणालाही काही सांगितलं नाहीये. ऑफकोर्स मी अप्सेट झालो आणि ते लोकांना दिसलं असेल. मी काही त्यांना बोलो असं नाहीये.

 

सगळ्यांना अशी खात्री होती की, आता विकास सेफ झाला म्हणून जेव्हा मीनल आतमध्ये गेली. आणि मला मीरा असं पण म्हणाली की, मी जेव्हा मीनलला विचारलं तू कोणाला सेफ करणार तेव्हा मीनल म्हणाली, विशालला कारण माझ्यासाठी फ्रेंडशिप जास्त महत्वाची आहे.” त्यावर मीनल म्हणाली, “तो माझा गेम होता... तुला हा निर्णय चुकीचा वाटला असेल तर मी तुला मनापासून सॉरी म्हणते.”

Read More
Tags
Loading...

Recommended