बिग बॉस मराठी 3 : विकास आणि सोनालीमध्ये यावरून झाले मतभेद...

By  
on  

बिग बॉस मराठीच्या सदस्यांचे वादविवाद, एखाद्या विषयावरून होणारे मतभेद, त्यांच्यातील भांडण, मारामारी हे आपण बघतच असतो. आज असंच काहीसं झाले विकास आणि सोनालीमध्ये... एका मुद्द्यावरून या दोघांमध्ये मतभेद होताना दिसणार आहेत. नक्की कशावरून ही चर्चा सुरू झाली हे आजच्या भागामध्ये कळेलच.

विकासचे म्हणणे आहे, मागील आठवड्यात आणि त्याआधी पण बोले होते. बाकी काही असलं तरी एकमेकांना loyal तरी आहेत. loyalty आली की तुमची जरा गडबड होते. सोनाली त्यावर म्हणाली, loyalty च्या बाबतीत मी मीनलवर कधीच अविश्वास दाखवणार नाही कारण आतापर्यंत ती फक्त आपल्यासाठी खेळली आहे, स्वत:साठी खेळली आहे. त्यामुळे अविश्वास दाखवणं, loyalty न दाखवणं हा विषय येतंच नाही. संभाषण सुरू असताना सोनालीने विकासला खडसावून सांगितले तू चेष्टेवारी घेणार असशील तर मी बोलत नाही. विकास त्यावर म्हणाला, तू आता दोन contradictory statement केलेस ना आता... सोनालीचे म्हणणे आहे ते महत्वाचे नाही आता मी बोलते महत्वाचे ते आहे. कुठेनाकुठे तू अविश्वास दाखवतो आहेस... आणि पुढे या दोघांची चर्चा अशीच सुरू राहिली.

बघूया काय होतं पुढे ते आजच्या भागामध्ये, बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Read More
Tags
Loading...

Recommended