बिग बॉस मराठी 3 : नवे सदस्य करणार बिग बॉस मराठीच्या घरावर राज्य

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा काही सदस्य दाखल झाले आहेत. हे सदस्य यंदाच्याच सिझनमधील स्पर्धक आहेत. तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य यांची बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. हे तिघं घरात आल्यानंतर एक वेगळं वातावरण तयार झालय.

शिवाय बिग बॉसनी नुकतच नॉमिनेशन कार्यही दिलय, ज्यात महत्त्वाची धुरा या नव्या सदस्यांच्या हातात देण्यात आली. तर दुसरीकडे आणखी एक नवं कार्य या नव्या सदस्यांना देण्यात आलय. आता हे तिघही बिग बॉस मराठीच्या घरात राज्य करताना दिसणार आहेत.

स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश यांना बिग बॉस यांनी कन्फेशन रुममध्ये बोलावुन घेतलं आणि त्यांना महत्त्वाचं कार्य सोपवण्यात आलय. बिग बॉस मराठीच्या घराचं रुपांतर आता लिलिपुट नगरात झालय. आणि हे तिघं या लिलिपुट नगरावर राज्य करणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत तिघांच्या डोक्यावर मुकूट दिसत असून तिघही घरावर राज्य करताना दिसतील. या कार्यादरम्यान आदिश आणि स्नेहामध्ये वाद होणार आहे. तेव्हा हा टास्क कसा पार पडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read More
Tags
Loading...

Recommended