तीन सीझन्सच्या जबरदस्त यशानंतर बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच

By  
on  

छोट्या पडद्यावरचा सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो म्हणजे बिग बॉस. या शोच्या मराठी सीझननेही तुफान लोकप्रियता मिळवली. बिग बॉस मराठीच्या 3 सीझन्सने आता पर्यंत रसिक प्रेक्षकांवर गारुड केलं. आता प्रेक्षक चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहतायत. पण चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे . त्यांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही असंच दिसतंय. लवकरच बिग बॉस मराठीचा चौथा सीझन येतोय असं कळतंय. 

यंदाचा बिग बॉस मराठीचा तीसरा सीझन तुफान हिट ठरला. या सीझनचा महाविजेता विशाल निकम ठरला. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे सीझन महेश मांजरेकर होस्ट करताना दिसले आहेत. येणारा सीझन कोण होस्ट करणार याबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. याशिवाय येणाऱ्या सीझनमध्ये कोण कलाकार स्पर्धक म्हणून झलकणार  याबद्दल देखील प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता लागली आहे.

बिग बॉस मराठीमुळे अनेक कलाकारांना नवी ओळख मिळाली. तर अनेकजण लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. नवनवे प्रोजेक्ट्स त्यांनी आपल्या नावे केले. 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Read More
Tags
Loading...

Recommended