Big Boss Marathi 4 - "पण राखी सावंत इथे आहेत त्यामुळे..." - अमृता धोंगडे

By  
on  

काल बिग बॉस मराठीच्या घरात पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात अक्षय केळकर संचालक होता आणि त्याच्या निर्णयानुसार आरोह, अपूर्वा, प्रसाद, विकास आणि स्नेहलता हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आले असून आता यामध्ये प्रेक्षक कोणाला वाचवणार ? आणि कोण बाहेर जाणार ? हे लवकरच कळेल. अपूर्वा आणि विकासचे आज कडाक्याचे भांडणं होणार आहे... आज घरात किरण माने, अमृता धोंगडे आणि राखी एका व्यक्तीविषयी चर्चा करताना दिसणार आहेत. 

किरण माने राखी आणि अमृताला सांगताना दिसणार आहे, बघितलंस का ? किती बोलते आहे ते ? राखी म्हणाली, बोलत राहा, बडबड करत राहा... अमृता धोंगडे म्हणाली, सुटली आहे ती... राखी म्हणाली, हो सुटलीच आहे ती, रात्री भांडी  घासायच्या वेळेस तिची भांडी आहेत मी का घासू ? माझं म्हणणं आहे  घासून टाक... अमृता म्हणाली, राखी प्रत्येक याच्यात ती बोलत होती हे काय ? हे काय ठेवले आहे ? हे कोणाचे आहे ? राखी म्हणाली, पण तो तिचा हक्क आहे आता ती सुटली आहे ती नॉमिनेट झाली ना... मला तर काहीच फरक नाही पडणार मला नॉमिनेट करा कि नका करू... मी अशीच सुटते.

अमृता धोंगडे म्हणाली, मला इतकंच माहिती आहे कसं काय असेना competition हि competition आहे, सगळ्या गोष्टी आहेत... पण राखी सावंत इथे आहेत, एकही दिवस, एकही मिनिट मजा करायचं सोडायचं नाही... राखी म्हणाली, बरोबर आहे.  

जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Read More
Tags
Loading...

Recommended