अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने या कारणासाठी चाहत्यांनाच विचारला हा प्रश्न

By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मिडीयावर सक्रिय असते. खासकरून इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रार्थना तिचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना दिसते. सध्या प्रार्थनाही तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये जाण्यापासून ते तिथे पोहोचल्यानंतरच्या सगळ्या अपडेट्स प्रार्थना सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेयर करत आहे. 

प्रार्थनाने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत प्रार्थनाच्या समोर ब्राउनी दिसत आहे. मात्र ही ब्राउनी खाऊ कि नको असा प्रश्न प्रार्थनाला पडलाय. म्हणूनच हा प्रश्न तिने थेट चाहत्यांना विचारत याविषयी गमतीशीर पोस्ट केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

खाऊ की नको ? #loveforbrownies #happymood #happyme

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

प्रार्थना सध्या आगामी सिनेमा 'छूमंतर'साठी लंडनमध्ये चित्रीकरण करत आहे. या सिनेमात प्रार्थनासोबतच अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता सुव्रत जोशी देखील झळकणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended