पाहा Video : जेव्हा अमेरिकेच्या रस्त्यांवर 'सही रे सही'ची टीम डान्स करते

By  
on  

केदार शिंदे यांचं भरत जाधव यांच्यासोबतच 'सही रे सही' नाटकाने धुमाकुळ घातला होता. या नाटकाने नाट्यरसिकांना अक्षरक्षह वेड लावलं होतं. भारतातच नाही तर परदेशातही या नाटकाने नाट्यप्रेमींना खळखळून हसवलं

मात्र आता केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी एका नव्या मालिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुखी माणसाचा सदरा' ही नवीन मालिका ते घेऊन येत आहे. या मालिकेचे विविध टीझरही प्रदर्शित करण्यात आले आहेत. या मालिकेच्या निमित्ताने केदार शिंदे आणि भरत जाधव हे सोशल मिडीयावर विविध पोस्ट करत आहेत. 

 

या मालिकेविषयी पोस्ट करताना भरत जाधव यांनी एक खास आठवण शेयर केली आहे. 'सही रे सही' नाटकाच्या अमेरिका दौऱ्याचा हा व्हिडीओ आहे. त्यावेळी या नाटकाच्या टीमने अमेरिकेच्या रस्त्यांवर कसा डान्स केला होता ही आठवण या व्हिडीओत आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended