या कारणासाठी अंकुश चौधरीने शेयर केली या सिनेमाची आठवण

By  
on  

याचवर्षी जानेवारी महिन्यात आलेल्या धुरळा या मराठी सिनेमाची चांगली हवा झाली होती. या सिनेमातील प्रत्येक पात्र लक्षवेधी ठरलं होतं. सिनेमाचा स्क्रिनप्ले, संवाद आणि उत्तमोत्तम कलाकारांची फळी या सिनेमात पाहायला मिळाली होती. 

अभिनेता अंकुश चौधरीने नुकतीच या सिनेमाच्या सेटवरील खास आठवण शेयर केली आहे. या सिनेमाच्या सेटवरील सगळ्या कलाकारांसोबतचा एकत्र फोटो अंकुशने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. धुरळा सिनेमाच्या या खास आठवणीचं कारणही तितकच खास आहे. कारण लवकरच हा सिनेमा आता प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. याच कारणासाठी अंकुशने ही पोस्ट केली आहे. लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पाहायला मिळणार आहे. 

 

समीर विद्वांस यांच्या या सिनेमात सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, अलका कुबल, प्रसाद ओक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. "हव्वा कुणाची रं, फक्त 'धुरळा' ची रं" असं म्हणत या सिनेमाचं हटके प्रमोशन करण्यात आलं होतं.

Read More
Tags
Loading...

Recommended