पाहा Photos : सई ताम्हणकरचे सनशाईन लुक सेल्फि

By  
on  

सोशल मिडीयावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते. नुकतच सईने तिचे खास फोटो पोस्ट केले आहे. सकाळी सुर्याची किरणे चेहऱ्यावर पडल्यावर एक वेगळाच तेज चेहऱ्यावर येतो. हाच ग्लो सईच्या चेहऱ्यावर या फोटोंमध्ये दिसतोय.

चाहत्यांनाही सईचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत. आजच्या दिवसाची सुरुवात सईने या सकारात्मक सकाळने केली असल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळतेय.

सई सोशल मिडीयावर सक्रिय जरी असली तरी इन्स्टाग्राम अकाउंटपासून तिने काही काळासाठी मोठा ब्रेक घेतला होता. मात्र सई पुन्हा इन्स्टाग्रामवर परतली.

सोशल मिडीयावर सईचा मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय सईविषयीच्या अनेक अपडेट्स तिच्या चाहत्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळत असतात.

Read More
Tags
Loading...

Recommended