पाहा Photos : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा साडीतील फेस्टिव्ह लुक

By  
on  

दिपावलीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक सेलिब्रिटींनी खास पारंपारिक वेशभुषेतील फोटो पोस्ट केले आहेत. विशेषकरून मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींचे या निमित्ताने साडी लुकही पाहायला मिळाले आहेत. त्यात साडी, बिंदी, दाग दागिन्यांनी नटलेले त्यांचे सुंदर फोटोंचा पाऊस सोशल मिडीयावर पडलाय.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचाही ट्रेडिशनल लुक यानिमित्ताने पाहायला मिळाला आहे. यासाठी खास चंदेरी साडीतील लुक प्रार्थनाने केला होता. पांढऱ्या रंगाचा ब्लाउज, चंदेरी साडी, नेकलेस आणि कडे असा हा सिम्पल आणि सोबर लुक पाहायला मिळाला.

प्रार्थनाने या लुकमधील खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. तिच्या या लुकला चाहत्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळे या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. दिवाळीच्या निमित्ताने प्रार्थनाने तिचे विविध साडी लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended