NCB अधिकारी पती समीर वानखेडेंवरील हल्ल्यानंतर क्रांती रेडकरने केली ही पोस्ट

By  
on  

NCBचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर हल्ला झाला. गोरेगाव येथे ड्रग्ज पेडलर्सकडून हा हल्ला झाल्याचं समोर येत आहे. यानंतर क्रांतीला पतीच्या स्वास्थ्याविषयी अनेकांकडून चौकशी करणारे फोन, मेसेज येऊ लागले. या संदर्भात क्रांतीने एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये क्रांती म्हणते, ‘तुम्ही दाखवलेल्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभार. समीर वानखेडे यांची तब्येत ठीक आहे.

 

 

 

आमच्या घरातील सर्वच कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एनसीबीच्या संपूर्ण टीमला सलाम. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो’. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत.सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन उघडकीस आलं. त्यानंतर अनेक कलाकारांवर अटकेची तलवार टांगती आहे. समीर यांच्या टीमवरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended