‘एक मत्त आनंदाची बातमी देणार’, प्रशांत दामले यांची उत्सुकता वाढवणारी पोस्ट

By  
on  

प्रसिध्द नाट्य-सिने  अभिनेते प्रशांत दामले हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आपल्या आगामी प्रोजेक्टसंदर्भात ते चाहत्यांशी संवाद साधतात. त्यांची मतं जाणून घेतात. अभिनेते प्रशांत दामले यांच्या फेसबुक पोस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये फार उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमकी काय बातमी असणार याचा अंदाज नेटक-यांनी बांधायला सुरुवात केली आहे. 

ही प्रशांत दामले यांची मिश्कील पोस्ट चर्चेचा विषय जरी ठरत असली ती उत्सुकता निर्माण करणारी आहे. सर्वांनाच ही नव्या नाटकाबदद्लची बातमीच वाटतेय.त्यामुळे चाहत्यांकडून प्रशांत दामले यांच्या या पोस्टवर भरपूर मजेशीर प्रतिक्ररीया येतायत. कारण या पोस्टमधील  ‘मत्त’ या शब्दाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

 

लवकरच एक मत्त आनंदाची बातमी देणार आहे मी

Posted by Prashant Damle on Monday, November 23, 2020

 

करोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जपली .   

Read More
Tags
Loading...

Recommended