अभिनेता हेमंत ढोमेच्या नव्या सिनेमाचं इंग्लंडमध्ये शूटिंग सुरु, सिनेमात झळकणार सोनाली कुलकर्णी

By  
on  

अनेक मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. तेव्हा येत्या काळात बऱ्याच मराठी सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यातच आणखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

अभिनेता हेमंत ढोमेने सोशल मिडीयावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये हेमंतने त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा उल्लेख केला आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतच इंग्लंडमध्ये सुरु करण्यात आल्याचं हेमंत या पोस्टमध्ये म्हणतो. हेमंत लिहीतो की, "नवा सिनेमा...इंग्लंड मधे शुट सुरू"

 

या सिनेमाविषयी कोणतीच माहिती हेमंतने या पोस्टमध्ये दिलेली नाही. मात्र त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सुद्धा दिसत आहे. तेव्हा या सिनेमात सोनाली झळकणार असल्याचं समोर येतय. मात्र याशिवाय आणखी कोणेत कलाकार या सिनेमात असतील आणि सिनेमाचा काय विषय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.

Read More
Tags
Loading...

Recommended