'तुझ्यात जीव रंगला' मधील वहिनीसाहेब झळकणार या नव्या गाण्यात

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत आता नव्या वहिनीसाहेब पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री धनश्री काडगावकर या मालिकेत वहिनीसाहेब साकारत होती. मात्र आता अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार या मालिकेत वहिनीसाहेबांच्या भूमिकेत दिसत आहे. माधुरी ही 'अप्सरा आली' या डान्स रिएलिटी कार्यक्रमाची विजेती आहे. 

माधुरीला आता वहिनीसाहेबांच्या भूमिकेत प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. शिवाय सोशल मिडीयावरही माधुरीचे डान्स व्हिडीओ हे चर्चेत असतात. मात्र माधुरी एक खास व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. 

'आभाळ हे भरलं' असं या नव्या म्युझिक व्हिडीओचं नाव आहे. प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी हे गाणं गायलं आहे. माधुरी पवार आणि श्रीराम लोखंडे या गाण्यात झळकत आहेत. येत्या 27 नोव्हेंबरला हे गाणं प्रदर्शित होणार आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended