पाहा Video : प्रार्थना बेहेरेची ही पण एक कला, असे रंगवले शूज
By miss moon
on
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला अभिनयाव्यतिरिक्त रंगकामाची, चित्रकलेची प्रचंड आवड आहे. सोशल मिडीयावरही प्रार्थनाची ही कला पाहायला मिळते. प्रार्थना तिच्या निवांत वेळेत तिचे हे छंद जोपासते.
नुकतच प्रार्थनाने तिच्या रंगकामाचा छंद वेगळ्या पद्धतिने जोपासला आहे. तेही चक्क शूज रंगवून. प्रार्थनाने पांढऱ्या रंगाच्या शूजवर सुंदर रंग भरून त्याला अधीक आकर्षक बनवलं आहे. सोशल मिडीयावरही प्रार्थनाच्या या कलेचं कौतुक होत आहे.
प्रार्थनाने शूज रंगवतानाचे व्हिडीओही सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. सोबतच शूज रंगवल्यानंतरचेही फोटो तिने पोस्ट केले आहेत. याआधीही प्रार्थनाने रेखाटलेली चित्रे, रंगवलेल्या सुंदर पेंटिंग पाहायला मिळाल्या आहेत.
Read More