पाहा Video : प्रार्थना बेहेरेचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

By  
on  

सोशल मिडीयावर पोस्ट करण्यासाठी सेल्फि क्लिक करताना अनेक फिल्टर्सचा वापर केला जातो. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही सेल्फि व्हिडीओसाठी एक फिल्टर वापरला. मात्र हा फिल्टर पाहताच प्रार्थनाला हसू आवरलं नाही. या फिल्टरने प्रार्थनाचा चेहरा कॉमेडी दिसू लागल्याने प्रार्थना स्वत:च हसू लागली.

 

प्रार्थनाने सोशल मिडीयावर हा व्हिडीओ शेयर केला आहे. प्रार्थनाचे हे हसणं कायम चर्चेत असतं त्यामुळे या व्हिडीओलाही पसंत केलं जातय. मात्र हे सेल्फि फिल्टर प्रार्थनाला यंदाच्या 2020 या वर्षासारखं वाटतय. म्हणूनच ती या वर्षाप्रमाणे या फिल्टरलाही गंडलेलं फिल्टर असं हॅशटॅग देत आहे. 

ती या पोस्टमध्ये लिहीते की, "मोठ्याने हसा.. कारण ह्या वर्षा सारखं हे फिल्टर पण गंडलं..  #गंडलेलंफिल्टर #गंडलेलंवर्ष2020"  प्रार्थनाच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय.

Read More
Tags
Loading...

Recommended