या खास मैत्रिणीने प्रार्थना बेहेरेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर प्रार्थनाला शुभेच्छा मिळत आहेत. यात सिनेविश्वातीलही मित्रमंडळींना प्रार्थनाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रार्थनाच्या खास मैत्रिणीकडूनही तिला शुभेच्छा मिळाल्या आहेत. ही खास मैत्रिण म्हणजे प्रार्थनाची कोस्टार आणि बेस्ट फ्रेंड सोनाली कुलकर्णी. सोनालीने प्रार्थनासोबतचा फोटो शेयर करत खास मेसेजही लिहीला आहे. 

 

सोनाली या पोस्टमध्ये लिहीते की, "माझ्या आनस्क्रिन मितवा पासून ते आयुष्यातील बेस्ट मैत्रिण. आपण एकत्र बरच काही केलय खरच. आणि म्हणून जग म्हणतं की ती एन्ड ती बेस्ट जोडी बनते."

 सोनाली आणि प्रार्थनाने आत्तापर्यंत 'मितवा', 'ती एन्ड ती' या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. या सिनेमांदरम्यान सोनाली आणि प्रार्थनाची चांगली मैत्री झाली. सोनालीसह अनेक सेलिब्रिटींनी प्रार्थनासोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेयर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended