पाहा Video : अभिनेता भूषण प्रधानने प्रार्थनाला या हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वाढदिवसानिमित्त तिला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. अनेक सेलिब्रिटींना प्रार्थनाला सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता भूषण प्रधानने मात्र प्रार्थनाच्या वाढदिवसाला तिच्यासोबतचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. 

या गमतीशीर व्हिडीओत भूषण आणि प्रार्थना दोघंही आहेत. दोघं त्यांच्या सिनेमाविषयी बोलत आहेत. तेव्हा भूषण प्रार्थनाला सिनेमा कशाविषयी आहे असं विचारतो तेव्हा ते सांगत असताना प्रार्थना एक इंग्रजी शब्द चुकीचं बोलते आणि हसू लागते. आणि हाच खास व्हिडीओ भूषणने तिच्या वाढदिवसाचं निमित्त साधून पोस्ट केला आहे.

 

भूषण या पोस्टमध्ये लिहीतो की, "आपण स्वत:वरच हसणं म्हणजे स्वत:वर प्रेम करणं.. असच स्वत:वर प्रेम करत रहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्पा. तुझ्या वाढदिवसाला खूप शुभेच्छा प्रेम आणि हास्य."

 भूषणचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पसंत केला जात आहे. शिवाय प्रार्थनालाही या हटक्या शुभेच्छा पाहुन हसू आलं असेल एवढं नक्की. 'कॉफी आणि बरचं काही', 'अजिंक्य' या सिनेमात प्रार्थना आणि भूषण यांनी एकत्र काम केलं आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended