यानिमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे झळकणार टेलिव्हिजनवरील या प्रसिद्ध कलाकारासोबत

By  
on  

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूमामा साकारणार अभिनेत्री सुमीत पुसावळेला या मालिकेतून बरीच प्रसिद्धी मिळाली. तो साकारत असलेल्या या व्यक्तिरेखेसाठी त्याचं प्रचंड कौतुक होत असतं. नुकतच सुमीतने एका जाहिरातीसाठी शूटिंग केलं आहे. या जाहिरातीत सुमीतसोबत मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार आहे.

सुमीतने सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयी नुकतीच माहिती दिली आहे. ही अभिनेत्री आहे प्रार्थना बेहेरे. सुमीतने प्रार्थनासोबत एका आगामी जाहिरातीचं चित्रीकरण केलं आहे. यानिमित्ताने सुमीतने प्रार्थनासोबतचे काही फोटो शेयर केले आहेत.

या जाहिरातीच्या निमित्ताने प्रार्थनासोबतचा अनुभव त्याने पोस्टमधून शेयर केला आहे. तेव्हा या जोडीला नव्या जाहिरातीत पाहण्यासाठी त्यांचे चाहते आसुसलेले असणार एवढं नक्की.

Read More
Tags
Loading...

Recommended