पाहा Video : "पहिलं हे कायम स्पेशल असतं" म्हणत प्रार्थना बेहेरेने केली ही घोषणा

By  
on  

अनेक कलाकार हे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. मात्र काहिंनी या माध्यमाचा वापर करून काहीतरी नवं करु पाहिलय. लॉकडाउनच्या काळात तर ते मोठ्या प्रमाणात होताना दिसलं. काही कलाकारांनी युट्युब चॅनल सुरु करून त्यांच्या नवा वाटचालीला सुरुवात केली. सोशल मिडीया हे माध्यम काहिंनी त्यांची आवड जोपासण्यासाठी तर काहींनी त्यांची नवी वाट सोशल मिडीयावर निवडली.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही तिच्या युट्युब चॅनलला सुरुवात केली आहे. एवढच नाही तर या चॅनलवर ती नवा शो सुरु करत आहे. हा शो एक ट्रॅव्हल शो असेल. प्रार्थनाने नुकतीच या शोची झलक सोशल मिडीयावर शेयर केली आहे. आणि तिचा पहिला वहिला युट्यूब चॅनल शो येत असल्याची घोषणा तिने केली आहे, ज्यासाठी ती प्रचंड उत्सुक आहे. "पहिलं हे कायम स्पेशल असतं" अस ती या पोस्टमध्ये लिहीते.

 

प्रार्थना या पोस्टमध्ये लिहीते की, "पहिलं हे कायम खूप स्पेशल असतं. पहिलं फोटोशुट, पहिलं ऑडिशन, पहिला टीव्ही शो, पहिली फिल्म. आणि आणखी काहीतरी पहिलं त्याच्या वाटेवर आहे. माझ्या पहिल्या युट्युब चॅनलच्या शोचा टीझर प्रेझेंट करतेय"

या टीझरमध्ये प्रार्थना प्रवासाचा आनंद लुटताना दिसत आहे. तेव्हा प्रार्थनाच्या या नव्या शोमधून देशासह जगभरातील विविध ठिकाणं पाहायला मिळणार असचं चित्र पाहायला मिळतय. तेव्हा प्रार्थना या नव्या शोमधून काय काय घेऊन येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Read More
Tags
Loading...

Recommended