पाहा Photos : पूजा सावंतने असा साजरा केला वाढदिवस

By  
on  

अभिनेत्री पूजा सावंतचा नुकताच वाढदिवस पार पडला. सोशल मिडीयावर पूजाच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. पूजाने तिच्या वाढदिवासाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेयर केले आहेत. फुग्यांनी सजवलेलं डेकोरेशन आणि केक सोबतचे फोटो पूजाने शेयर केले आहेत. पूजाला वाढदिवसानिमित्ताने मिळालेल्या शुभेच्छांसाठी पूजाने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

पूजा पोस्टमध्ये लिहीते की, "माझा वाढदिवस अप्रतिम आणि संस्मरणीय बनवण्यासाठी सगळ्यांचे खूप धन्यवाद. मी सगळ्यांचे आभार मानते ज्यांनी मला या दिवशी खास शुभेच्छा  आणि प्रेम दिलं. मी खूप नम्र आणि धन्य झाले."

या फोटोंमध्ये पूजाचा खास लुक पाहायला मिळतोय. पूजाने पिवळ्या रंगाचा गाऊन घातलाय. वाढदिवासासाठी पूजाने स्पेशल लुक केलेला पाहायला मिळतोय. या फोटोंमधून पूजाने वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळतय. पूजाच्या चाहत्यांनीही तिचा हा वाढदिवस शुभेच्छा देऊन स्पेशल केल्याचं पाहायला मिळतय. 

Read More
Tags
Loading...

Recommended