पाहा Video : बाबा होण्याच्या बातमीनं कार्तिकचा आनंद पोटातही मावेना

By  
on  

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. यातच आता या मालिकेतील पात्र दीपा प्रेग्नेंट असल्याचं समोर आलं आहे. कार्तिकला जेव्हा ही बातमी कळते तेव्हा कार्तिक दीपाला याविषयी विचारतो. मात्र ही बातमी कार्तिकला सांगण्या आधीच माहिती पडल्याने दीपा रडू लागते. कार्तिक दीपाला शांत करतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या बातमीनं कार्तिक चांगलचा आनंदी झाला आहे. कार्तिक बाबा बनणार हे कळल्यावर त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. कार्तिक हा आनंद दीपासोबत शेयर करतो. कार्तिकला आनंदी पाहुन दीपाही खुश होते. मात्र एवढ्यातच कार्तिकचं भागत नाही. तर कार्तिक ही बातमी आपल्या कुटुंबालाही सांगण्याची इच्छा व्यक्त करतो. मात्र ते करण्यापासून दीपा त्याला थांबवते, तरीही कार्तिक दीपाला सगळ्यांसमोर ही बातमी सांगण्यासाठी घेऊन जातो.

नुकत्याच प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये हे दाखवण्यात आलय. मात्र यापुढे काय होणार ? दीपा ही गोड बातमी का सगळ्यांपासून लपवतेय ? हे या मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईलच.

Read More
Tags
Loading...

Recommended