नवविवाहीत जोडपं मानसी नाईक आणि प्रदीप निघाले हनीमूनला ? शेयर केले एअरपोर्टवरील हे फोटो

By  
on  

यावर्षी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांचा लग्नाचा सिझनच जणू पाहायला मिळतोय. एकामागोमाग एक कलाकारांची लग्न होताना पाहायला मिळतय. याच महिन्यात अभिनेत्री मानसी नाईक विवाहबंधनात अडकली. मानसीच्या लग्नाआधी मेहंदी, संगीत, हळदी समारंभही पार पडले. सोशल मिडीयावर या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. 

लग्नानंतर मानसी प्रदीपसोबत तिच्या सासरी म्हणजे फरिदाबादला गेली. नुकतच प्रदीपने दोघांचे एअरपोर्टवरील फोटो शेयर केले आहेत. हे फोटो पाहुन ही नवविवाहीत जोडी आता हनीमूनला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतय. तेव्हा या गोड कपलच हनीमून डेस्टिनेशन काय असेल हे लवकरच त्यांच्या पोस्टवरून कळेलच.  

मागील वर्षी मानसीने तिच्या प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला. ती प्रेमात असल्याची कबुली तिने दिली. मागील वर्षी दोघांनी साखरपुडा देखील केला. आणि या वर्षी या गोड जोडीनं लगीनगाठ बांधली. 

Read More
Tags
Loading...

Recommended