Photos : सिध्दार्थ - मितालीच्या लग्नसोहळ्यातला हा रॉयल कारभार तुम्ही पाहायलाच हवा

By  
on  

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. मोठ्या धुमधडाक्यात पुण्यातील ढेपेवाडा येथे ही जोडी विवाहबंधनात अडकली. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे हा लग्नसोहळा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत होता. मात्र,24 जानेवारी रोजी रविवारी अखेर कुटुंब आणि  मित्र-परिवाराच्या साक्षीने त्यांनी सप्तपदी घेतल्या. सिध्दार्थ मितालीच्या लग्नसोहळ्यासाठी अनेक प्रसिध्द मराठी कलाकार आवर्जुन उपस्थित होते. 

आता नुकतेच सिध्दार्थ मितालीच्या शाही लग्नसोहळ्यातला रॉयल कारभार म्हणजेच त्यांच्या  रिसेप्शनचे खास फोटो चाहत्यांसमोर आले आहेत. 

 

राजा आणि त्याची राणी म्हणत हा शाही थाटातला फोटो सिध्दार्थने चाहत्यांशी शेअर केला आहे.  

 

 

 

 

सिध्दार्थ चांदेकर या शाही थाटात अगदी राजबिंडाच दिसतोय.  

 

सिध्दा्थ-मितालीच्या लग्नसोहळ्यातले सर्वच क्षण चाहते सोशल मिडीयावरुन अनुभवत खुश आहेत.  

 

Read More
Tags
Loading...

Recommended