पिवळ्या साडीत खुललं गायत्री दातारचं सौंदर्यं, पाहा Photos

By  
on  

गेल्या कित्येक दिवसांपासून सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर  या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर २४ जानेवारीला ही सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात अडकली. पुण्यातील ढेपे वाड्यात हा विवाहसोहळा शाही थाटात पार पडला या लग्नसोहळ्यासाठी कलाविश्वातील अनेक प्रसिध्द कलाकार खास उपस्थित होते.

मराठी मनोरंजनविश्वातील या प्रसिध्द जोडीच्या लग्नसोहळ्याच्यानिमित्ताने लॉकडाऊननंतर ब-याच महिन्याने सर्व कलाकार एकत्र जमले आणि सर्वांनी मस्त नट्टापट्टा करुन मिरवून घेतलं. या लग्नसोहळ्या ईशा फेम लाडकी अभिनेत्री गायत्री दातारही गोड अंदाजात पाहायला मिळाली. 

 

 

या पिवळ्या रंगाच्या साडीत साध्या पण तितक्याच मनमोहक लुकमध्ये गायत्री खुलून दिसली. 

 

‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून ईशा अर्थातच अभिनेत्री गायत्री दातार घराघरात पोहचली. तिच्यातील सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ‘युवा डान्सिंग क्विन’ या डान्स रिॲलिटी शोच्या माध्यमातून आपल्या अदाकारीने आणि नृत्यकौशल्यातून तिने प्रेक्षकांना भुरळ घातली.

‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नाटकातही तिने उत्कृष्ठ कामगिरी बजावली. गायत्री सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून विनोद बुद्धीने आणि कॉमेडीच अचूक टायमिंग साधत अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवते. 

Read More
Tags
Loading...

Recommended