पुष्कर- मंजिरीची फ्रेश जोडी होणार 'अदृश्य' जाणून घ्या

By  
on  

अभिनेता पुष्कर जोग आणि बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस अदृश्य या आगामी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघायला मिळणार आहेत . नुकतेच या चित्रपटाचे शुटिंग डेहराडून येथे सुरू झाले आहे . बॉलिवूड चे प्रथितयश सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत . कबीर लाल यांनी आज पर्यंत वेलकम बॅक, परदेस , ताल , हम आपके दिल में रेहते है या व अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांची  सिनेमॅटोग्राफी केली आहे  तर अजय सिंग हे निर्माते लवली वर्ल्ड प्रॉडक्शन्स या बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करत आहेत .

नुकतेच पुष्कर जोग यांनी आपल्या सोशल हँडल वरुन या चित्रपटाची घोषणा केली , आता रसिक प्रेक्षकांना या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघण्याची उत्सुकता असणार यात शंका नाही.

 

 

 

अलिकडेच पुष्कर या सिनेमाच्या शूटींगसाठी डेहराडूनला रवाना झाला होता. एअरपोर्टवरचा एक व्हिडीओसुध्दा त्याने शेअर केला होता.  

 

Read More
Tags
Loading...

Recommended