अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने केली या सिनेमासाठी डबिंगला सुरुवात

By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही 'छूमंतर' या आगामी सिनेमात झळकणार आहे. प्रार्थनाने नुकतीच या सिनेमाच्या डबिंगला सुरुवात केली आहे. तसा व्हिडीओही तिने सोशल मिडीयावर शेयर केला आहे. शिवाय डबिंग हे सगळ्यात आवडतं काम असल्याचं ती या व्हिडीओत सांगते. लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं असून नुकतच प्रार्थनाने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.  

या पोस्टमध्ये प्रार्थना डबिंग टाईम असं म्हणत हा फिल्ममेकिंगमधील तिचा सगळ्यात आवडता भाग असल्याचं सांगतेय.

 

समीर जोशी दिग्दर्शत हा सिनेमा मराठी आणि हिंदी असा एक द्वैभाषिक सिनेमा आहे. या सिनेमात प्रार्थना बेहेरेसह रिंकू राजगुरु, ऋषी सक्सेना, सुव्रत जोशी झळकणार आहेत. बालकलाकार श्रीनिवास पोकळे देखील या सिनेमात आहे. या सिनेमाच्या निमित्ताने या कलाकारांनी लंडनवारी करून सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळतील. 

तेव्हा हा सिनेमा नेमका काय विषयावर आहे ? या सिनेमात काय पाहायला मिळेल यासाठी सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended