पाहा Video : "अपना टाईम आयेगा" म्हणत प्रार्थना बेहेरेने शेयर केला हा व्हिडीओ

By  
on  

सोशल मिडीयावर अनेक अभिनेत्री मराठी अभिनत्री मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यापैकीच एक आहे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. प्रार्थना सोशल मिडीयावर विविध व्हिडीओ आणि फोटो शेयर करताना दिसते. इन्स्टाग्राम या सोशल मिडीया अकाउंटवर तिचे 1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तिच्या पोस्टनाही मोठ्या प्रमाणात पसंती असते.

प्रार्थनाने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओवरही चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 

या व्हिडीओत प्रार्थनाच्या हातात सँड टायमर आहे, ज्याला वाळूचे घड्याळ म्हणतात. हे घड्याळ हातात घेऊन प्रार्थनाने हा व्हिडीओ केला आहे. मात्र या पोस्टचं कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधतोय. प्रार्थना या पोस्टमध्ये "अपना टाईम आयेगा" असं म्हणतेय. म्हणजेच "आपली वेळ येणार" असा त्याचा अर्थ होतो. 'गलीबॉय'या सिनेमातील अपना टाईम आयेगा हे गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं होतं. तेव्हापासून ही ओळ अनेक ठिकाणी वापरली जाते. 

सोशल मिडीयासह आता प्रार्थनाने स्वत:चं युट्यूब चॅनेलही सुरु केलं आहे. ज्यात ती विविध ट्रॅव्हल व्हिडीओ शेयर करते.

Read More
Tags
Loading...

Recommended