Video : कुणीतरी येणार येणार गं, अभिनेता अक्षय वाघमारेच्या पत्नीचं झोकात पार पडलं डोहाळेजेवण

By  
on  

गँगस्टर अरुण गवळी यांची लेक योगिता गवळी हिने  अभिनेता अक्षय वाघमारेशी ८ मे २०२० रोजी लग्नगाठ बांधली. या लॉकडाउनच्या कळात त्यांनी लग्न केले. आता गँगस्टर अरुण गवळी लवकरच आजोबा होणार असल्याची गोड बातमी आहे. अभिनेता अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर योगिताच्या डोहाळे जेवणाचा एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. 

अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर योगिताचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘पाहुणा घरी येणार येणार गं…’ असे म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये योगिताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दरम्यान ती अतिशय आनंदी असल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी अक्षयच्या या व्हिडीओवर कमेंट करत या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 

Read More
Tags
Loading...

Recommended