अभिनेता जितेंद्र जोशी निर्मित गोदावरी सिनेमा ह्या दिवशी येतोय रसिकांच्या भेटीला

By  
on  

अभिनेता जितेंद्र जोशी निर्मित गोदावरी या मल्टिस्टारर सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे.  'पुणे ५२' या चित्रपटातून लक्ष वेधून घेतलेला दिग्दर्शक निखिल महाजनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच म्हणजेच 30 एप्रिल 2021 रोजी गोदावरी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय. 

ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स यांनी "गोदावरी"ची निर्मिती केली असून पवन मालू, मिताली जोशी हे चित्रपटाचे निर्माते आहेत तर आकाश पेंढारकर, पराग मेहता हे सहनिर्माते आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. कथा पटकथा निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख यांची असून संवाद ही प्राजक्त देशमुख याचे आहेत. जितेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना ए. व्ही. प्रफुलचंद्र याने संगीत दिले आहे.

 

 

दिग्दर्शक निखील महाजन याने आपल्या सोशल मिडीयावरुन याबाबतची माहिती दिली आहे. 

 

Read More
Tags
Loading...

Recommended