‘गाव की गोरी’ ते Stylish babe, रुपाली भोसलेचा मेक ओव्हर पाहून चाहते अवाक

By  
on  

'आई कुठे काय करते' या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे संजना. अभिनेत्री रुपाली भोसले संजनाच्या व्यक्तिरेखेत दिसते आहे. मॉडर्न, स्वतंत्र अशी संजनाची व्यक्तिरेखा आहे. रुपाली सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. रुपालीने नुकतच शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण आलं आहे. रुपालीने एक थ्रोबॅक आणि एक मॉडर्न लूकमधील फोटोचं कोलाज शेअर केलं आहे.

 

 

तिचा जुन्या फोटोपासून ते आतापर्यंतचा मेक ओव्हर पाहून चाहते थक्क झाले आहेत. या फोटोच्य कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘या मुलीने खुप लांबवर प्रवास केला आहे. यामध्ये माझ्यावर विश्वास ठेवलेल्यांचे आणि न ठेवलेल्यांचेही आभार. हा प्रवास चढ-उतारांचा होता. पण माझी जिद्द अजूनही कायम आहे. मला तुझा अभिमान वाटतो मुली.’

Read More
Tags
Loading...

Recommended