मारहाणीच्या ‘त्या’ व्हिडियोबाबत हेमंत ढोमेची तिखट प्रतिक्रिया

By  
on  

अलीकडेच एका वृद्धेला पती मारहाण करतानाचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडियोमध्ये या वृद्धेला अत्यंत अमानुषपणे मारहाण करत असताना दिसत होते. हा व्हिडियो व्हायरल होताच सोशल मिडियावर अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अभिनेता हेमंत ढोमेनेही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. 

 

 

हेमंत आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, ‘त्या भामट्या गजानन चिकणकर ला जबर शिक्षा व्हायला हवी! आपल्या वृद्ध बायकोला अमानुष मारहाण करणारा बुवा कसला… विचार करा किती वर्ष त्या माऊलीने अन्याय सहन केला असेल…’ या प्रकरणातील मारहाण करणा-या व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended