'लस घेउन फोटो काढला की अंग दुखत नाही' म्हणत शशांक केतकरने शेअर केला हा फोटो

By  
on  

मागील काही महिन्यात करोनाचा कहर थोडाफार कमी झाला असला तरी धोका अजूनही टळलेला नाही. करोनावर लस काही अंशी का होईना प्रभावी ठरते आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लसीकरण जोर धरु पाहात आहे.  अनेक कलाकारही स्वत: लस घेत आहेत. याशिवाय चाहत्यांना करोना लस घेण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. 

 

 

अभिनेता शशांक केतकरनेही करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘लस घेउन फोटो काढला की अंग दुखत नाही.  मी घेतली आहे तुम्ही पण घ्या.’ त्याच्या या भन्नाट पोस्टवर चाहते कमेंटही तितकीच भन्नाट करत आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended