अभिनेता, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने त्याच्या ऑनस्क्रीन जिजाऊंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

अनेक भुमिकांचं अभिनयाच्या माध्यमातून सोनं करणा-या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. मृणाल यांच्यावर फॅन्सकडून आज शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. पण शुभेच्छांच्या पोस्टने मात्र नेटिझन्सचं लक्ष वेधलं आहे.  अभिनेता, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने अभिनेता, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने मृणाल कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

दिग्पाल आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘सकलकलागुण लक्ष्मीअलंकृत वज्रचूडेमंडित सरस्वतीअलंकार राजश्री श्रीमंत ताईसाहेब, मृणालताई यांसी बालके दिग्पालचा साष्टांग प्रणिपात!
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!’ 
दिग्पाल यांच्यासोबत मृणाल फत्तेशिकस्त, फर्जंद आणि आगामी पावनखिंड या सिनेमात दिसल्या आहेत. विशेष म्हणजे या तिनही सिनेमात त्या जिजाऊंच्या भूमिकेत दिसल्या. प्रेक्षकांनीही त्यांच्या या भूमिकांचं कौतुक केलं.

Read More
Tags
Loading...

Recommended