पाहा Video : यासाठी सुव्रत जोशी झाला 'जॉबलेस', आगामी वेब सिरीजची पहिली झलक प्रदर्शित

By  
on  

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून लोकप्रिय ठरलेला कलाकार अभिनेता सुव्रत जोशी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आगामी वेब सिरीजमध्ये सुव्रतचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. या सिरीजच्या निमित्ताने सुव्रत साकारत असलेलं पात्र जॉबलेस दाखवण्यात आलय. 'जॉबलेस' असं या वेब सिरीजचं नाव असून निरंजन पत्की यांनी ही सिरीज दिग्दर्शित केली आहे.

ही एक रहस्यमयी वेबसिरीज असेल. या सिरीजचे सात भाग असून ही गुन्हेगारी आणि रहस्यमय धाटणीची कथा आहे. नुकतीच या सिरीजची पहिली झलक म्हणजेच टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. सुव्रतने सोशल मिडीयावर या वेब सिरीजचा टीझर शेयर केलाय. तो लिहीतो की, "परिस्थिती बदलली की...नशीब बदलतं? "जॉबलेस" ... पहिली झलक... येतोय लवकरच...प्लॅनेट मराठी वर..."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sula (@suvratjoshi)

 

 या टीझरमध्ये सुव्रत साकारत असलेली व्यक्तिरेखा जॉब नसल्याने काय संकटांना सामोरं जातेय हे पाहायला मिळतय. या सिरीजमध्ये सुव्रतसोबत हरीश दुधाडे, पुष्कर श्रोत्री, मयुरी वाघ, स्वप्नाली पाटील, राधा धरणे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. प्लॅनेट मराठीवर ही वेब सिरीज प्रदर्शित करण्यात येणारेय.

सुव्रतने नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून वेगळी ओळख निर्माणे केली आहे. या वेब सिरीजच्या माध्यमातून सुव्रतची व्यक्तिरेखा आणि त्याचा अभिनय पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read More
Tags
Loading...

Recommended