पाहा Video : बहीण मृण्मयी देशपांडेसोबत लहानपणी गौतमी अशी करायची मस्ती

By  
on  

'माझा होशील ना' या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे प्रचंड लोकप्रिय ठरलीय. विविध मालिकांमध्ये काम केल्यानंतर या मालिकेतील तिची सई ही व्यक्तिरेखा पसंत केली गेलीय. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण म्हणून नाही तर आता एक उत्तम अभिनेत्री म्हणून गौतमीने ओळख बनवली आहे. सोशल मिडीयावरही गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. गौतमी अनेकदा सोशल मिडीयावर बहीण मृण्मयीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करताना दिसते.

काहीवेळी गौतमी-मृण्मयी या दोघी बहिणी एकत्र गाताना दिसतात तर कधी मस्ती करताना दिसतात. या दोघी बहिणींची जोडी एकत्र पाहायला नेटकऱ्यांनाही आवडतं. मात्र गौतमीने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या लक्षवेधी ठरतोय. कारण या व्हिडीओत लहानपणीच्या या दोघी बहिणी पाहायला मिळत आहेत. 

 

एकीकडे गौतमी प्रचंड लहान दिसतेय तर बहीण मृण्मयी तिच्यासोबत खेळताना दिसतेय.  हेच ते बहिणींचं नातं आणि निरागस प्रेम. हा गोड व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पसंत केला जातोय. 

लहानपणीचे दिवस असं म्हणत गौतमीने हा व्हिडीओ शेयर केलाय. ती पुढे लिहीते की, "आज तुम्ही काहीतरी क्युट पाहणार आहात. 28 वर्षांपूर्वीच्या मी आणि ताई. खूप जणं आम्हाला सूचना करत आहेत. तुम्हाला कसं आवडलं ते सांगा."

Read More
Tags
Loading...

Recommended