गायकाशी सुरु असलेल्या डेटिंगच्या चर्चेवर आर्या आंबेकरची पोस्ट चर्चेत

By  
on  

लोभस चेहरा आणि सुरेल आवाज असलेली गायिका म्हणजे आर्या आंबेकर. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मध्ये एकेकाळी स्पर्धक म्हणून आलेली आर्या आज त्याच शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसली आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्या सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध गायक आणि संगितकाराला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या.

 

 

मात्र आता आर्याने एक पोस्ट शेअर करत याबाबत खुलासा केला आहे. आर्या आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘काही बाबी स्पष्ट करायच्या आहेत. सोशल मिडियावर काही अफवा वेगाने व्हायरल होत आहेत. त्याबाबत.... 
“गेल्या १२ वर्षांपासून कोणतीही टॅलेंट एजन्सी मला मॅनेज करत नाही. इंन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील माझे सर्व फॉलोअर्स ऑर्गेनिक आहेत. तसचं यूट्यूबवरील सबस्क्रायबर आणि व्हूजदेखील ऑर्गेनिक आहेत. फॉलोअर्स, सबस्क्रायबर आणि व्ह्युज विकत घेण्याच्या संकल्पनेवर माझा विश्वास नाही आणि मी त्याच्या विरोधात आहे.

 

 

ते माझ्या नैतिकतेमध्ये बसत नाही. प्रमोशन किंवा कार्यक्रमांसाठी मी थेट संवाद साधते. आर्या याबाबत पुढे म्हणते, ‘मी एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छिते की ते माझे मार्गदर्शक आहेत. काहीही अफवा असल्या तरी मी त्यांचा कायम आदर करत आले आहे आणि करेल. मला त्याचं कौतुक वाटतं.’ तिच्या या पोस्टचं अनेक सेलिब्रिटीही कौतुक करत आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended