अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने शेअर केला बाळासोबतचा पहिला फोटो

By  
on  

युट्युबर, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने अलीकडेच आई बनल्याची गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. अलीकडेच तिने डोहाळेजेवणाचे फोटो, व्हिडियो चाहत्यांसोबत शेअर केले होते. बेबी बम्पचे फोटो पोस्ट करण्यावरुन तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं होतं. पण तिने या सगळ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं.

 

 

आता तिने पहिल्यांदाच बाळासोबतचा क्युट फोटो शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये उर्मिला म्हणते,  ‘उर्मिला आणि एक गोंडस बाळ! बाळाबरोबरचा पहिला फोटो,  मला कधी कधी विश्वासच बसत नाही, ही गुंडाळलेली अळी, हा एक बरीटो,  माझा आहे.'  उर्मिलाने 3 ऑगस्टला बाळाला जन्म दिला होता.

Read More
Tags
Loading...

Recommended