‘लग्नकल्लोळ’ या आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर समोर

By  
on  

लग्नघरातील धमाल असलेला  'लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच समोर आलं आहे. मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

अभिनेत्री मयुरी देशमुखने या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘कोरोनाचा गोंधळ आणि क्वारंटाईन चा घोळ, अख्ख्या महाराष्ट्रासाठी मनोरंजनाची लस घेऊन लवकरंच येतोय " लग्नकल्लोळ  या सिनेमात  भारत गणेशपुरे,प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर,सुप्रिया कर्णिक, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, संतोष तिरमखे आणि डॉ. आशिष गोखले  हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended