Photos : परश्याचा रफ एन्ड टफ लुक पाहून चाहते सैराट

By  
on  

सैराट सिनेमाने अवघ्या मराठी सिनेसृष्टीलाच नाही तर बॉलिवूडलासुध्दा वेड लावलं. या सिनेमाचा साधा-सुधा नायक परश्या साकारुन अभिनेता आकाश ठोसरने सर्वांचीच मनं जिंकली. परश्या हीच त्याची ओळख बनली. पण आता तो त्याची नवी ओळख प्रस्थापित करु पाहतोय.

 

अनेक हिंदी सिनेमे, वेबसिरीज आणि जाहिरांतीमधून परश्या फेम आकाश प्रेक्षकांसमोर येतोय. एवढंच नाही तर सैराटच्या वेळेचा आकाश आणि आत्ताचा आकाश यात प्रचंड फरक आहे.

त्याने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केल्याचं पाहायाला मिळतंय. 

सोशल मिडीयावर आकाश सतत सक्रीय असतो.

आपले अनेक व्हिडीओ, फोटो आणि इतर अपडेट्स तो चाहत्यांशी शेअर करतो. आकाश प्रचंड फिटनेस फ्रिक आहे, हे एव्हाना तुम्हाला समजलंच असेल.

 

परश्याचं हे नवं ब्लॅक आणि व्हाईट अंदाजातलं रफ आणि टफ फोटोशूट चाहत्यांना प्रचंड भावतंय. 

Read More
Tags
Loading...

Recommended