नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर पुन्हा नव्या सिनेमासाठी एकत्र

By  
on  

नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर ही जोडी सैराटनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘घर बंदुक बिर्याणी’ हे नागराज यांच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा टिझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे की, फँड्री, सैराट आणि नाळच्या यशानंतर झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे प्रस्तुत ‘घर,बंदूक, बिर्याणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

 

अभिनेते सयाजी शिंदे आणि सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर हे या सिनेमात दिसतील. नागराज मंजुळेही या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहेत. या सिनेमाची कथा आणि पटकथा हेमंत अवताडे यांनी लिहिली आहे. ए.व्ही.प्रफुलचंद्र यांनी संगीत दिलं आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता वाढली आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended