'घेतला वसा टाकू नको' मधून मिसेस मुख्यमंत्री फेम ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून 'एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता' या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. नुकतंच प्रेक्षकांनी नवरात्री विशेष भाग अनुभवले.

आता येत्या आठवड्यापासून शनीदेवांची जन्मकथा आणि शनी देव माहात्म्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या निमित्ताने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ती सूर्यदेवांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. हि भूमिका साकारताना आणि पुन्हा एकदा टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अमृताने उत्सुकता व्यक्त केली.

तेव्हा पाहायला विसरू नका घेतला वसा टाकू नको ‘शनीदेवांची जन्मकथा आणि शनी देव माहात्म्य’ विशेष सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Read More
Tags
Loading...

Recommended