ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर

By  
on  

प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गीतरामायणकार गदिमा उर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांची १४ डिसेंबर रोजी ४४ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गदिमा पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना जाहिर झाला आहे. 

 गदिमा स्मृती समारोह १४ डिसेंबर २०२१ रोजी कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे आणि त्याचवेळी गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गदिमा पुरस्कार आणि गदीमा पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended