सोनाली खरेचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, ‘मायलेक’ सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे हिने टीव्हीचा पडदा गाजवणयासोबतच अनेक मराठी सिनेमांमधून आपल्या भूमिकांनी छाप पाडलीय. सोनाली सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध शोजच्या माध्यमातून ती रसिकांची मनं जिंकते. ‘अनुराधा’ या वेबसीरिजमध्ये तिने वकिलाची भूमिका साकारली. आता सोनालीने नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मातृदिनाच्या निमित्ताने तिने एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती ती स्वतः करणार आहे.

सोनालीने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. या प्रॉडक्शन अंतर्गत तिने ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट आई आणि मुलीच्या सुंदर नात्यावर आधारित आहे. आई-मुलीचं सुंदर नातं दाखवण्याचा प्रयत्न सोनाली या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहे. प्रियांका तन्वर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.

 

 

या चित्रपटाबदल निर्माती सोनाली खरे म्हणते, " मी निर्मित केलेला हा पहिला चित्रपट आहे. मातृदिन हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास असतो. आईचे एक वेगळे महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मुलगी आणि आईच्या नाजुक नात्यावर बोलणारा हा चित्रपट आहे. या खास दिनी माझा पहिला चित्रपट ‘मायलेक'ची घोषणा करणे, हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. लवकरच ‘मायलेक’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून हळूहळू अनेक गोष्टी समोर येतील."

 या चित्रपटाचे लेखन एमेरा यांनी केले असून छायाचित्रण मृदुल सेन यांनी केले आहे.

 

Read More
Tags
Loading...

Recommended